जीवन एक संघर्ष
जीवन एक संघर्ष


🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
बेधुंद साजणा
प्रेमात तुझ्यामी,
सारेच मिळाले
नसे काही कमी....
भेटलास असा
मनी सुख आले,
सहवासी तुझ्या
रममाण झाले....
प्रेमात तुझ्या रे
स्वर्गसुख आले,
अर्थ जीवनाचे
. नव्याने कळाले...
उरले न मीच
तुझी झाले अशी,
सुखकल्लोळ हा
झेलला उराशी..
तुझ्यासवे माझे
जगणे नि श्वास,
जीवनात सदा
मजसाठी खास....
🌷🌷🌷🙏🙏🌷🌷🌷