STORYMIRROR

jaya munde

Inspirational

3  

jaya munde

Inspirational

शिक्षक

शिक्षक

1 min
152


*विषय-माझे शिक्षक*

*शिर्षक -माझे दैवत*

************************

   माझे शिक्षक,माझे दैवत

   दिला आकार व्यक्तीमत्वाला,

   जीवनाच्या वळणावर एक

   अनोखा मार्ग नितीतत्वाला..


    वसा ज्यांनी दिला ज्ञानाचा

    कळस चढवला यशाचा,

     माझे शिक्षक सर्वस्व माझे

    कळस मढविला आयुष्याचा


आज मी सुखात आहे 

    माझ्या सुखाचे कारण ,

  सन्मार्गाला कवटाळले आहे

   शिक्षक हेच सौख्याचे धोरण.


   शतदा नमन गुरूवर्यास

   ज्यांनी घडविले मजला,

   आयुष्याच्या प्रवाहाला

    उजळूनी क्षणाक्षणाला..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational