STORYMIRROR

jaya munde

Children

2  

jaya munde

Children

जादूगरी

जादूगरी

1 min
74

 सोबतीने निसर्गाच्या

 बावरली क्षणभर कविता

 हिरव्या-हिरव्या रंगांसह

 आवकाशात खुलली कविता


 हसरी छबी मोहकमय ही

 लाली गालावर प्रितीची आली,

 नार सौंदर्यवती ती एक अप्सरा

 सौख्याची किमया अशी झाली...


 साक्षीने निसर्गाच्या आज

 गंध, परीमळला दाहीदिशा,

 ती तर गुलछडी अलवार कळी

 जगण्याची जागविते मज नवआशा.

   

  गीत गाऊनी वाऱ्यासवे

  मधूर धून संगीतमय होई,

  मनोत्तराचे थेंब बरसता

  मंत्रमुग्ध जणू होऊन जाई...


 अलवार स्पर्शिता मनास माझ्या

  शब्दप्रितीचा मधूरस भाळतो,

  सौंदर्यांची मी तर गुलछडी

  निसर्गही आज कवेत मावतो


   आयुष्याच्या ओंजळीत किती

  हसरी मौक्तीके अलवार आली,

   बेभान मीही क्षणभर होऊनी

   त्या रंगात मनसोक्त न्हाली...


    जादूगरी ही स्पर्शून जाता

    मी न माझी क्षणभर राहीले,

    जगण्याची अविट गोडी

   स्वप्नवत सारे इंद्रधनु पाहिले


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children