Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Smita Murali

Children

3.8  

Smita Murali

Children

खारुताई

खारुताई

1 min
1.6K


खारुताई गं खारुताई

किती गं तू चपळ बाई

खाली वर करुन करुन

थकवा कसा येत नाही


रुप तुझे खुलवितो

करडा तपकिरी रंग

मऊ मऊ केसांनी

सजले तुझे गं अंग


झुबकेदार शेपटीचा

भलताच बाई तोरा

झाडावरची राणी तू

गोड तुझा गं नखरा


टुकटुक टुकटुक हलवून मान

टवकारुन टिल्ले कान

शेंगा खातेस आवडीने

आवाज ऐकून पळते छान


रामसेतू बांधण्यात म्हणे

तुझाही होता ना वाटा

रामायणात गौरवलेला

तूच गं तो जीव छोटा


उंच उंच झाडावर बाई

असते तुझी गं वस्ती

देईन तुला शेंगा नि खाऊ

कर ना माझ्याशी दोस्ती!!!


Rate this content
Log in