STORYMIRROR

Shila Ambhure

Children

3  

Shila Ambhure

Children

अक्षरजत्रा

अक्षरजत्रा

1 min
27.8K


शाळेत चल ना

माझ्या मित्रा,

तिथे रे भरली

अक्षरांची जत्रा.


जत्रेत आली

अक्षरे सारी,

आकार त्यांचे

लय लय भारी.


अक्षरांची नावे

जाणून घेऊ,

एकेक अक्षर

बाईंना देऊ.


अक्षरांना देऊ

चिन्हे स्वरांची,

वाचूया नावे

तयार शब्दांची.


करू आता घाई

चल रे मित्रा,

शाळेत भरली

अक्षर जत्रा.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Children