STORYMIRROR

Mrudula Raje

Classics Others Children

4  

Mrudula Raje

Classics Others Children

आवडती भारी माझे आजोबा

आवडती भारी माझे आजोबा

1 min
487

आजोबा हे एक अजबच रसायन आहे 

सुंदर लकेर घेणारे ते मधुर गीत-गायन आहे 


आई-बाबा रागावल्यावर बसण्यासाठी एक आसन आहे 

आपले हट्ट पुरवून घेण्यासाठी आजोबा एक साधन आहे 


त्यांच्या ताटातला घास खाताना अमृताची गोडी जाणवते 

तेच अन्न आपल्या ताटात बेचव आणि बेकार लागते 


आजोबांच्या गोष्टी ऐकताना रात्र कधी संपू नये वाटते 

मांडीवर झोपला नातू , आजोबांची मांडी अवघडते


आईची जेव्हा असते किट्टी, आजोबा क्रिकेट खेळायला नेतात 

मी मैदानात सिक्सर मारतो,आजोबा टाळ्या शिट्ट्या वाजवतात 


घरी परत येताना मग पिझ्झा, बर्गर घेऊन देतात 

आजोबांबरोबर त्यांच्या क्रिकेटच्या जुन्या आठवणी मस्त रंगतात 


कधी श्लोक, मंत्र म्हणतात ; कधी इंग्लीश फर्डे बोलतात 

कधी धोतर नेसून पूजा करतात, कधी बर्मुडा घालून फिरतात 


आजोबा कधी गंभीर वाटतात, आजोबा कधी हळवे भासतात 

मनातले विचार दडवत, आजोबा ईश्वर-स्मरण करतात 


आमच्या घरात असतात तेव्हा , आजोबा नेहमीच गोड वागतात 

गावी परत जायला निघताच, हळूच रुमालाने डोळे टिपतात 


आजोबांना समजून घेताना , रोज नवीन लागतो शोध 

आजोबा "देवाची देणगी ", एवढाच एक होतो बोध!!      


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics