STORYMIRROR

Mrudula Raje

Others

4  

Mrudula Raje

Others

श्रीमंत

श्रीमंत

1 min
220

मनाची श्रीमंती हीच माणसाची खरी संपत्ती 

धनाची समृद्धी कधीकधी श्रीमंतासही देते दुर्गती 


असेल जरी श्रीमंत, परी मनाने जो असमाधानी 

सुखशांती नाही लाभत कणभरही त्याच्या जीवनी 


गाडी-बंगला, नोकरचाकर, सदैव असतील दिमतीला

मनःस्वास्थ्य नसेल जर त्याला, लाभेल सौख्य का शरीराला 


सदैव चिंता असते ज्याला आपल्या संपत्ती रक्षणाची 

गरज त्याला पडते निरंतर बंदूकधारी संरक्षकाची 


चाळीत, झोपडीतही राहून सुद्धा असतो जो माणूस आनंदी 

शेजा-याच्या सुखात पाही सुख; तो दिलदार, मनाचा स्वच्छंदी 


एखाद्याच्या नशीबी नसतो अति पैसाअडका, धनसंपत्ती 

देव करतो बहाल त्याला विविध कलागुणांची श्रीमंती 


मस्त कलंदर तो कलेत रमतो ; रंगवतो चित्रे, गातो गाणे 

संपत्ती नसली जरी त्याकडे, जग त्याच्या कलेचे दिवाणे 


लोकप्रियता अमाप लाभते, परी नाही गर्वाची बाधा 

"श्रीमंत" एकच तोच जगी ह्या, जरी दिसायला भोळा-साधा 


                 


Rate this content
Log in