Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Mrudula Raje

Fantasy

3  

Mrudula Raje

Fantasy

विज्ञानाचा चमत्कार

विज्ञानाचा चमत्कार

1 min
163


एके दिवशी छोटी पिंकी शोधत होती चांदोबाला 

दूर आभाळात कुठे दिसेना, घाबरली ती अंधाराला 


हळूच चादरीमध्ये लपुनी झोपी गेली पिंकी घाबरुनी 

स्वप्नामध्ये तिला थोपटे एक गोड परी गाणे म्हणुनी 


परी विचारी पिंकी राणीला, "काय हवे गं बाळे तुजला?

झालीस का तू मलुल अशी ही, का घाबरलीस अंधाराला?"


पिंकी वदली, " शोधत होते, चांदोमामा गेला कोठे?

लपून बसला, शोधू पहाते, पण चहूकडे अंधारच दाटे 


परी राणी, तू मैत्रीण माझी, जाऊन सांगशील का बाप्पाला 

आकाशामध्ये नकोच काळोख, चंद्र दिसू देत रोज आम्हाला 


सांगशील ना दिवे लावण्या, ट्यूब लाईटस् मोठेमोठ्ठे 

स्विच इथे जमिनीवर दाबता, आकाशातही दिवे पेटते "


परी राणीने विचार केला , "पिंकीची ही छान कल्पना, 

देवाला मी सांगितल्यावर, भेटवस्तू मज मिळतील नाना "


स्वर्गामध्ये देवसभेमध्ये परीराणीने प्रस्ताव मांडला 

विरोधकांचा गदारोळ अन् मित्र पक्षही इथे भांडला 


तरी परी राणी नाही डगमगली, अहवाल तिने सादर केला 

पृथ्वी पासून घेतले कनेक्शन, तर खर्च किती हा हिशोब मांडला


वरुण राज इंद्रही बोलले, "वीज निर्मिती देईन करून मी 

द्यावे त्याचे कंत्राटही मजला, युक्ती वापरीन माझ्या नामी"


"आकाशामध्ये बांधून देईन ऊंच खांब मी पोलादाचा"

विश्वकर्मा स्वयं वदले, अंदाज घेऊन लागत खर्चाचा 


"तंत्रज्ञ आणा भारतातले, शास्त्रज्ञ प्रगत त्या देशामधले ,

तेच बनवतील नंदनवन येथे", श्रीविष्णू मग स्वयं वदले


जागेची मग पाहणी झाली, कारखाना उभारणी केली,

पृथ्वीपासून स्वर्गापर्यंत संपर्काची सोयही झाली. 


पंतप्रधान येणार भूमिपूजनाला,

 परदेशीच्या राजदूतांची वर्णी लागली उदघाटनाला.


अमावास्येच्या काळ्या रात्री पिंकीने मग स्विच दाबला 

एका क्षणातच पृथ्वीपासून स्वर्गाचा मग रस्ता उजळला


आता नसतो काळोख कधीही अमावास्येच्या रात्रीलाही 

अतर्क्य आमचे विज्ञान, जे कधी लपवत नाही चंद्रालाही 


                


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy