STORYMIRROR

Pratibha Tarabadkar

Fantasy Inspirational

4  

Pratibha Tarabadkar

Fantasy Inspirational

मंत्र

मंत्र

1 min
291

कल्पनेच्या अरण्यात फिरत होते दूर

तेवढ्यात आला बासुरीचा मंजुळ सूूर

अचानक फाकली समोर तेजाची प्रभा

बघते तो काय, प्रत्यक्ष देवच उभा

तसबिरीतल्या सारखीच मुद्रा दैदिप्यमान

करांमध्ये धरले होते धनुष्य आणि बाण

त्याला पाहून अस्वस्थ जीव माझा उसासला

उदास माझा चेहरा पाहून देव गालात हसला

बोल वत्सा बोल तुझ्या मनात काय साचलंय

मी निर्मिलेल्या सृष्टीत तुला काय डाचतंय??


देवा तुझ्या राज्यात फक्त भ्रष्टाचार आणि बलात्कार

कोण म्हणतो, देव उसळला,आठव ते संत महात्मे,

ते नव्हेत का दिव्य साक्षात्कार?

देवा तुझ्या राज्यात कचऱ्याचे किती ढीग सांग

देव म्हणाला मी तर निर्मिली होती पर्वत रांग

देवा तुझ्या सृष्टीत प्रदूषणाचा दुर्गंध

देव वदला मी तर निर्मिली सुवासिक पुष्पे अन् मृद्‌ गंध

देवा तुझ्या राज्यात कर्कश्श ध्वनीचा काच

देव वदला मी तर निर्मिली समुद्राची गाज

जरी देवाने केले निरुत्तर,जाणार नाही हार

वादविवादामध्ये देवालाही हरवून टाकीन पार

देवा तुझ्या राज्यात रोज संप मोर्चे अन् बंद

वरती बसला आहे मानगुटीवर महागाईचा समंध


देव हळूहळू आपल्याच विचारात बुडला

चिंताक्रांत होत स्वतःशीच पुटपुटला

हात आणि डोळे होते गुंतलेले,निर्मित होतो मानव

कळलेच नाही कधी शिरला त्यांच्या कळपात दानव

निर्मितीच्या नादात चुकले कोठेतरी

आता नियंत्रण शक्य नाही जरी

पण तक्रारी नकोत देव कुजबुजला कानात

मंत्र एक सांगतो आहे माझ्या मनात

साद घाल जरा अन् हात कर पुढे

मदतीचा ओघ वहात येईल तुझ्याकडे

जर जमतील सारे मानव होऊनी एकसाथ

होईल निर्मळ सृष्टी जर घ्याल मनावर आज

बागडतील पशूपक्षीही या भूमीवर स्वच्छंदे

प्रसन्न होऊनी वसुंधरा ही हसेल मग आनंदे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy