STORYMIRROR

Manoj Joshi

Fantasy

3  

Manoj Joshi

Fantasy

तान्ह्या बाळाचे संभाषण

तान्ह्या बाळाचे संभाषण

1 min
28.3K


तुला पाहून जगणे कळते

तुला पाहून असणे उमगते II धृ II


तुझे हास्य गाली खुले

शीण दिवसाचा विरे

कसे कळते तू माझी ते

प्रश्न नाही इथे फक्त उत्तरे


तुला पाहून जगणे कळते

तुला पाहून असणे उमगते II धृ II


रांगणे तुझे ते परीं

जगणे माझे धावते

एकेक पाऊल टाकती

हृदय संगीत गाते


तुला पाहून जगणे कळते

तुला पाहून असणे उमगते II धृ II


आवाज तुझा कानी गुंजणे

शब्दांविना कसे भाषा बोलणे

ध्वनी चे लहरी काम नेमके

ह्या हृदयी चे त्या हृदयी पोचवणे


तुला पाहून जगणे कळते

तुला पाहून असणे उमगते II धृ II



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy