सुख
सुख
नको वाटतात सुखाचे शहारे
थंड प्रवाहाखाली जळतात निखारे
नको ठेवू उघडे कुठलेही दरवाजे
नाहीच उरले ते परतून येणारे
तुच्छ वाटते जगणे स्वार्थीपणाचे
हवे हवे से इथे मारणारे
कुणाला न पृच्छा तुझ्या आसावांची
तोडले हात जे डोळे पुसणारे
पंख जयांचे त्यांस भीती आकाशाची
टपलेले होते नेम धरून पाडणारे
नको लावू बाजी खुळ्या अपेक्षांची
जिंकतील तुला इथे रोज हारणारे
प्रवास तुझा माझा वेगवेगळ्या दिशेचा
गर्दीत हरवले रोज रोज भेटणारे
काही क्षणांचा विसावा हवा चेतन
दिसेनासे झाले क्षितिज खुणावणारे
