जगणे
जगणे
मनासारखे कधी जगाया मिळावे
श्वास मोकळा कधी घ्यावया मिळावे
उसनी का घ्यावी नजर कुणाचीही
स्वतः च स्वतः ला पहाया मिळावे
काळजी का हातावरील रेषांची
मुठीतील बळ आजमावया मिळावे
मिशिवरी समाधानी मर्दानगी जिथे
कुंकवाचे बळ तिथे कळाया मिळावे
तलवारीचे तेज ज्या ठाई साठलेले
शब्दांचे प्रखर साज ल्यावया मिळावे
भरारी घेताना आकाश ठेंगणे पडावे
मूळ धरेला कवेत घ्यावया मिळावे
सांगोनी इतुके थकू नकोस चेतन
चांगले काही आज लिहावया मिळावे
