सार जगण्याचे
सार जगण्याचे


स्वतः बाहेर बघा जरा
मन मोठं जगा जरा
खिसे भरून ओसंडाया लागले
थोडं वाटायला शिका जरा
लपवून झाकून ठेवलेले काळीज
मन मोकळं बोला जरा
उद्या, उद्या करू म्हणताना
आजचा विचार करा जरा
मुठीत घट्ट दाबून ठेवलेले
सुख लख्ख दाखवा जरा
जिगरा लागतो दुःख झेलायला
स्वतः ही ओझं उचला जरा
माणूस म्हणून माणसाशी नाते
जुने ते सारे विसरा जरा
चार खांदे असावे ओळखीचे
चेतन सांगतो ऐका जरा