मनातला श्रावण
मनातला श्रावण

1 min

208
एक गेलाय बरसून
एक धावतो मागुन
सरी जातीय भिजवून
ओले चिंब माझे मन
कुठून थोडासा डोकावतो
सूर्य कसा खुळावतो
काळ्या ढगांशी भांडतो
नभ जाई सप्तरंगात नाहून
कसा आरसा भासतो
दव बिंदूत झाकतो
प्रतिबिंब मनास स्पर्शतो
अंतर्बाह्य जाई दिपून
जयासाठी धावते मन
ओंजळी जपून एक क्षण
द्यायचे यावे ते अर्पून
इथे नभाचे आंगण