तू
तू
अखेर येशील सांडून सारे
मनातले मनाशी भांडून सारे
करशील विनवण्या जोडुनी हाथ
पण जाशील मांडलेले सोडून सारे!
भरवसा नाही तुजवर जरासा
भावनांचे मनोरे देशील पाडून सारे
कुठे आहेत त्या शपथा - बाता
शब्दांच्या डबक्यात गेले बुडून सारे
नको आसवांचे दाटलेले डोळे
अश्रूंनी गेले उरलेले वाहून सारे
कसा बसा राहिला संसार सावरलेला
जायचे तुझ्या हुंदक्यानी मोडून सारे
लिहू नकोस एक शब्द ही चेतन
इतिहास जातील पहा पुसून सारे
