Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Prashant Shinde

Drama

3  

Prashant Shinde

Drama

आपण खोटं का बोलतो..!

आपण खोटं का बोलतो..!

1 min
2.8K


आपण खोटं का बोलतो

शेवटपर्यंत जाणत नसतो

तरीही खोट बोलत असतो

कारण आपण दिसतो तसे नसतो...


माना अथवा ना माना

हे त्रिकालातीत सत्य आहे

असूया राग, द्वेष, ईर्षा

अजूनही आपल्यात शाबूत आहे...


दिले कितीही परमेश्वराने

तरी आपण अतृप्तचं

हे ही तितुकेच खरे

सत्य अंतरात आहे...


आपल्या तृप्ततेची महती

दाखवून काही फरक पडत नाही

ती आतच आपल्याला

जाळल्या वाचून रहात नाही...


शिवाजी जन्मावा दुसऱ्या घरी

इतुकेच हे खरे सत्य आहे

प्रामाणिकपणा दुसऱ्यात हवा

हे वाटणे स्वाभाविक आहे...


पण नर नारी देह धारण होता

निर्मळ असावा सदा भाव

सत्याचा करावा अंगीकार

घेण्या निर्मळ भावाचा ठाव...


पटो अथवा ना पटो

आपल्या सत्यअसत्याचे आपण साक्षीदार

कशास मग आपल्या सत्याची

अपेक्षावी दुसऱ्याकडूनी प्रतवार....


तो जगदीश्वर जाणतो सर्व काही

पापपुण्याचा तोच भार वाही

सत्यास कमी काही पडत नाही

असत्यास कधी पुरे पडत नाही....


शेवटी खोट्याच्या कपाळी सोटा

हाच विवेक धरतीवरी मोठा

असला जरी डोईस शेला पागोटा

जन्म व्यर्थची सारा असेल जर 'खोटा'...!


Rate this content
Log in