Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Dr.Surendra Labhade

Drama Tragedy Classics

4.5  

Dr.Surendra Labhade

Drama Tragedy Classics

शिकवण करोणाची

शिकवण करोणाची

2 mins
371


वेळेपेक्षा आयुष्याला,

आली होती गती, 

काम एके काम, 

हरवली होती मती


पाचच्या गजरे मुळे, 

हरपुन जायची निद्रा, 

कामाच्या व्यापामुळे, 

करपून जायची मुद्रा


सुट्टी मागतांना दिवसाची, 

अटकुन राहायचा श्वास, 

ऑफिस भासे काळेपाणी, 

हिटलर वाटे बॉस


सुट्टी करण्या साऱ्यांची, 

काळाने केली गर्जना, 

जग सारेच बंद झाले, 

फैलावला तो करोना


शहरांकडील रस्ते सारी, 

गावांकडे ती वळाली, 

मार्ग मिळेल तसा, 

लोकं गावी पळाली


दुरावलेली ती मैत्री, 

पारावर पुन्हा मिळाली, 

गप्पांचा पडला पाऊस, 

माणुसकी ती कळाली 


पहाटेचा मंद वारा, 

फुंकर घालून गेला, 

सुखावला किती तो, 

शहरातील जीव अर्धमेला


दारापुढे कचरा नव्हता, 

होती रांगोळी सडा, 

न्याहरीस चटणी भाकरी, 

नव्हता टपरीवरचा वडा. 


रस्ते सारेच मोकळे, 

नव्हती शहरांतील वर्दळ, 

गप्पा मारत चाले सारे, 

नव्हती कुणामागे धावपळ


सुंदर वाटे किती, 

आजीच्या जात्यावरील म्हणी, 

फिके पडे त्यापुढे, 

शहरातील डिजेवरील गाणी


ताज्या झाल्या साऱ्या, 

बालपणीच्या आठवणी, 

मृदु झाली होती ती, 

दरडवणाऱ्या बापाची वाणी


शहरातील तो माणुस, 

गावाकडेच नादावला, 

धावपळीतील तो जीव, 

आईच्या कुशीत स्थिरावला


नकोशी वाटली त्याला, 

ऑफिसातील ती वणवण, 

धावपळीतुन मुक्त झाला, 

तेव्हा कळाले जीवन


शहरातील मातीला नसतो, 

गावाकडील तो गंध, 

करोना शिकवुन गेला, 

खरे अनमोल ऋणानुबंध

𝕯𝕾


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama