अंतर
अंतर
प्रेम गंगा वसे इथे,
असे आपुलकीचा भाव,
जिव्हाळ्याचे माहेरघर,
सुंदर असे ते गाव.
गर्दीच ते ठिकाण,
घड्याळ चाले तिथे भरभर,
माणुसकी मुळीचं नाही,
असते ते शहर.
जिव द्यावा दोस्तासाठी,
गावात असतो कायदा,
शहरांमधील मैत्रीमध्ये,
दडलेला असतो फायदा.
सुर्याची कोवळी किरणे,
फक्त गावावरतीच पडतात,
कडक उन्हाचा प्रहर,
मोठी शहरे झेलतात.
कोंबड्याची सुंदर बांग,
उठवीते सारं गाव,
शहरात अलार्म वाजून थके,
तरी उठेना राव.
नदीचा खळखळाट,
ऐकू येई गावात,
गटारीचा दुर्गंध तो,
पसरे साऱ्या शहरात.
गावात माणसं घडतात,
माणुस पळे माणुसकीमागे,
शहरात लोक बिघडतात,
जो तो पळतो पैशामागे.
आजी गोष्टी सांगे,
ओसरीवरती गावात,
कार्टुन दिवसरात्र चाले,
शहरामधील घरात.
गावात रुचकर ती,
स्वादिष्ट चुलीवरील चव,
शहरामधे गॅसवरील,
आण्ण असे बेचव.
खळखळून हसतात माणसे,
मुलं खेळतात गावात,
शहरातील गप्प टिव्हीपुढे,
शुकशुकाट असतो घरात.
गावात कुणी पाहुणी येवो,
आदराने बसवती आसना,
शहरात चिमुरड्या बळी पडे,
गल्ली बोळात हिंडे वासना.
गावातील देवघरात,
मनमुराद नाचे देव,
शहरातील मंदिरात मात्र,
देवालाही वाटे भेव.
