प्रेमात पडलो
प्रेमात पडलो
प्रेमात पडलो, पुरता बिघडलो
प्रेम कसलं, माय फूट
कुठं आहेस, काय करतो ?
प्रश्नाची नुसती पेटती भट्टी
आपण मनवावं, तिनं रूसावं
आपण कूस बदलून तळमळावं
तिनं मात्र बिनधास्त घोरावं
प्रेम कसलं नसती आफत
प्रेम बीम सब झूट
अमेझींन कसलं कटकट नुसती
घरी -दारी, भर बाजारी
बदनामीच बदनामी ...
गिफ्ट द्या, हौटेलिंग करा
मिस कॉल येता फोन करा
उशीर होता माफी मागा
रुसवे - फुगवे वैताग नुसता
प्रेम बीम सब झूट , कसलं क्युट ?
मित्रांचे टोमणे,रात्रीचे जागणे,
रोजच तिचे स्वप्नात येणे नकोच ते
जगणे बरे आपले सिंगल सिंगल