गझल
गझल


विरह वेदनांनी मढवले म्हणाला।
सखीने जरासे रडवले म्हणाला।।...
अही दंश झाला जहर त्यात नव्हते
जहर माणसांनी पळवले म्हणाला।।...
दिवाणी उभी ती, रणी एक राधा
तिला यातनांनी घडवले म्हणाला।।...
स्वतःला अबाधीत ठेऊ न शकलो
स्वतःला स्वतःशी लढवले म्हणाला ।।...
भले काय करतील स्वार्थी पुढारी
गरीबास त्यांनी नडवले म्हणाला।।...
जुन्या माणसांच्याच शोधात आम्ही
कहर ह्या नव्यांनी करवले म्हणाला।।...
तपासात अंती पुरावे मिळाले
खलांनी छलाने हरवले म्हणाला।।
सभा मेंढरांच्या, भरवल्या नव्याने
कसाईच नेते ठरवले म्हणाला।।..
मला नाव नाही मला गाव नाही
मला माणसांनी कळवले म्हणाला।।...