STORYMIRROR

Mina Shelke

Tragedy

4  

Mina Shelke

Tragedy

अंध:कार

अंध:कार

1 min
27.9K



जिकडे तिकडे माजला अत्याचार

कीती बोकाळला बघा हा भ्रष्टाचार


माणूस झाला स्वार्थापायी लाचार

पैशापाठी धावतो सारा शिष्टाचार


रक्ताच्या नात्यांतही उरला न अर्थ

मायाममतेच्या जागी लपलाय स्वार्थ


माणसानेचं माणसाचे व्हावे वैरी !

बेछूट गोळीबार , झडतात फैरी


सद्विचाराचे चाले चहूकडे दमन

कुठे शिल्लक स्वतःप्रती तरी अमन ?


चांगुलपण ऊभे मनाच्या वेशीबाहेर

कसा होईल हातून चांगला व्यवहार


अंधकार दाटत चाललायं चहुदिशा

कधी येईल सत्ययुग हीच आहे आशा


झाली आजकाल माणुसकी वांझ

बहुतेक कलियुगाची येतेयं सांज



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy