STORYMIRROR

Kimaya Dhawan

Tragedy

2.7  

Kimaya Dhawan

Tragedy

स्त्री व्यथा

स्त्री व्यथा

1 min
29K


मी थकलेय आता स्वतःला सतत सावरून

आता थोडेच दिवस अशी खोटी आशा ठेवून

प्रेमाच्या खोट्या भूलथापांना बळी पडून

प्रेमाचे खोटे इमले खरे मानून

मी थकलेय आता

तू येतोस, तुला हवं तसं बोलतोस

प्रेमाच्या खोट्या शपथा मी घ्याव्यात

तुझं दुःख हलकं करावं ही अपेक्षा करतोस

तू रडतोस, चिडतोस, भांडतोस, मारतोस, कुरतडतोस

तुला वाटतं ह्याने मला फरक पडत नाही

पण तुला नाही कळत की , तू माझ्यावर मानसिक बलात्कार करतोस

तुला वाटत ह्याने मला फरक पडत नाही

मी एक भिंत आहे अभेद्य ज्याला पाझर फुटत नाही

तुझ्या एकटेपणाचा राग तू माझ्यावर काढतोस

तोंड दाबून बुक्क्यांचा मार देतोस

ह्या शरीरातील दोन खड्डे रोज बघत असतात

मात्र त्यांच्यातलं पाणी झूट असतं

तुझ्यासाठी तुझा प्रेमभंग हा महत्त्वाचा असतो

पण सोडण्याच कारण valid नसतं

मी थकलेय आता मी खरंच थकलेय आता

तुझ्या ह्या किंकाळ्याना, सतत माझ्या मढ्यावर बसून दुःख व्यक्त करण्याचा

तुझ्या आयुष्याची 'करुण' कहाणी ऐकण्याला

मी थकलेय आता तुझ्या स्पर्शाला

स्पर्शातून जाणवणाऱ्या वासनेला

मी थकलेय आता

एक दिवस असा येईल की तुझ्या हातात काहीच नसेल

देहाची झालेली माती वाऱ्याबरोबर उडून गेली असेल.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy