STORYMIRROR

Mangesh Medhi

Tragedy

4  

Mangesh Medhi

Tragedy

नकोशी

नकोशी

1 min
27K


हे ही एक जंगलच आहे

फक्त ईथले नियम निराळे

माणूस शिकारी ईथे

अन शिकारही माणूसच

झडप हरिणीवर ईथेही

फक्त तिथे भूक पोटाची

ईथे मात्र वासनेची ....व्यथीत ती


म्हणून तर आज, मायेलाच नकोशी लेक


भय चालायचे, भय बोलायचे

भय जगायचे, अन आतातर

भय, भय, अन फक्त भय....जन्म घ्यायचे


म्हणून तर आज, मायेलाच नकोशी लेक


तिने हे कराव, अस कराव !

अजुन सक्षम व्हाव !

अन त्यान निर्लज्ज पणे, संस्कारहिन, फक्त माजाव ?


मी जे भोगते ते, नको तीज भोगणे

माहेर - सासर पोसणे,

तीलाच कळा सोसणे, वेदना सार्‍या तीलाच

नको स्त्रीजन्म, बाईचा जन्म नको


म्हणून तर आज, मायेलाच नकोशी लेक


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy