पाऊस
पाऊस
आभाळात कशी चालली मस्ती
ढगांची ढगांशी जुंपली कूस्ती
तुषार ते उधळीत
अवखळ तो छेडीत
तप्त तनूस रिजवित
विरहाग्नी शमवित
आला, आला तो आला
मन मोर नाचवित
चातकास तृप्तवित
घनमीठीत घेत घेत
प्रेमामृत शिँपित बरसत
आला , आला तो आला
प्रणय रस संगीत
रास रंग खेळीत
गोपीकेस भुलवित
धीट वाट अडवित
आला, आला तो आला.
चुंबीत भिजवित
प्रियेसी नाचवित
लगट तन झोंबीत
मोती मोती फुलवित
आला, आला तो आला.

