माहेर
माहेर
येता सण दिवाळीचा, मनी आनंद भरला,
लाडका गं बंधुराया आज न्यायला आला
माझी वाट माहेराची, मला बहुत गं प्यारी,
जन्मापासूनच तीची माझी दोस्तीच न्यारी
मायमाउली ती आज जाते सुखावून,
आपल्या पिल्लाच्या भेटीने जीव तो उल्हसित
आज पाहता वास्तू, डोळे भरून येती,
भातुकलीच्या आठवणीत जीव गुंतून जाई
बालपणीची सखी तिथं सोबती हितगुज करायला,
अन् आईच्या जेवणाची चव पुन्हा मिळते चाखायला.😊
नाही नियम कुठले, नाही बंधने कसली,
माहेरच्या स्वातंत्र्यात सासुरवाशिण दंगली. ☺️
वाटे माहेर सुरेख, त्या परक्या धनाला,
अशा माहेराची सर कशी येईल सासरला?
