सुख
सुख
गहिवरले मन तुझे ओथंबून आल्या भावना, सारखी निराश नको होऊस तू, दुःख तुझे पाहवत नाही मला..
दुःख तुझे काय तर, घरची असलेली परिस्थिती, पण तुला माहितीय ना घरोघरी असतात मातीच्याच चुली
तू गृहलक्ष्मी, काटकसरीने चालविते संसाराचा गाडा न थकता, तिथेहि एकटी नाही तू, पतीच्या साथीने, कुटुंबाच्या आधाराने, पिल्लाच्या किलबिलाटाने पडतो तुझ्या अंगनि आनंदाचा सडा
तुला सांगू , इथं प्रत्येकाला हवंय समाधान, म्हणूनच जातो माणूस सुखाच्या शोधात,
पैसा, सुखसोयी म्हणजे सुख अशी समजूत तो करतो अन आपली खरी सोय करनाऱ्या आपल्या माणसांना मात्र तो विसरतो
क्षणिक मोहापायी अमाप खर्च करतो,यात आपली खरी गरज काय हेही विसरतो
Online च्या जगात माणसांचे सर्व व्यवहार सदैव On च राहतात but खऱ्या आयुष्यात ते कधीच Line वर येत नसतात..(सरळ होत नसतात)
ही दुनिया आजकाल अशीच चालते, ही जगाची रीत आहे पण सुख समाधान आपल्या मानण्यावरच आहेत
