तू चंद्र माझा
तू चंद्र माझा
तु चंद्र माझ्या मनातला...
तु ध्यास माझ्या उरातला..
तु सुगंध आपल्या सहवासातला...
तु मोगरा वेणीतला दरवळणारा...
चांदणे शीतल मधुचंद्र हसरे,
पाहण्या हे दृश्य नयनांनी झुरावे...
तुझ्या नभात मी निलरंगी नहावे...
पांघरुणी पंख तुझे, नभी या विहारावे...
बावऱ्या प्रितीतला केवडा उमलला. ..
अधिर चांदण्यातला चंद्र तो घायाळला..
असे ही स्वप्न...
तुझे मी.. माझे तु पहावे
तु चंद्र माझ्या मनीचा
मी ही तुझ्या व्हावे. ....

