एक मी एक तू
एक मी एक तू
एक मी एक तू, पाहिले स्वप्न तुझ्यासवे
रंगुनी रंगात तुझ्या, नयनांनी जगले स्वप्न तुझ्यासवे
ओढीने तुझ्या वेध घेतला प्रेमाचा
दरवळणारा गंध तो तुझ्यात विसावलेल्या मिठीचा
आतुरलेल्या स्पर्शाने रोमांचित झाले
थंड श्वासात उष्ण श्वास मिसळले
मिलनाच्या आर्ततेने दोन जीव सुखावले
एकांतात त्या विरघळून गेले
दोन मने 'एक जीव' लागली हि संगती
तुझी नि माझी प्रत्येक गोष्ट आता अर्धी अर्धी
भान आले वर्तमानाचे
स्वप्नच जणू ते अधुरे..पूर्ण व्हावया सखया तुझी वाट पाहे

