आठवणींचे जाळे....
आठवणींचे जाळे....


येती मनाला ही माझ्या गोळे
नजरेसमोर आठवणींचे जाळे...
जगात झालं आहे माझं हसू
लपलो आहे कूठे कसा दिसू
तोंडावर गोड लबाड सारे भोळे...
जीवनाच हे कसलं राजकारण
सत्य लपलं उघड खोट कारण
मनाची ही सत्ता भावनेत काळे...
पणाला लावल सारं दुसऱ्यासाठी
काही उरलं आहे का माझ्यासाठी
जीवनाचे माझ्या हे नको ते चाळे...
केला ना मी कुणाचा हेवा देवा
संगम एकटाच चांगला आहे देवा
पुसेन मी माझ्या हाताने अश्रू निळे...