एकटा
एकटा


बदललेल्या सहवासात
साजणी मी राहू कसा
छान दिसणार नाही मी
तुजवीन एकटा असा...
राणी सुरवात तूच केली
होती आपल्या प्रेमाची
आज आस का सोडत
आहेस माझ्या नामाची....
मला लागलेली असते
तुझ्याचं प्रेमाची भूक
जिवापाड प्रेम तुझ्यावर
सांग माझी काय चूक...
तुला गमावून होईल ग
माझ्या जीवनाचा तोटा
आधीच सोबत ना कोणी
सांग जगू मी कसा एकटा....
देवानं तुला भरभरून
राणी नेहमी सुख द्यावं
तुझ्या वाट्याच गं दुःख
संगमच्या वाट्याला यावं....