तुझ जाण
तुझ जाण
1 min
188
तुझ येणं तुझ जाणं
मस्तीत ते गं पाहण
वेडा होतो माझा जीव
मला लागते गं तहान....
हळूच तुझा चढे नशा
वाईट होते माझी दशा
कस सांगू मी गं तुला
एक तूच आहेस महान....
तुझ्यावर रोज लिहू का
सांग तुला रोज पाहू का
भरली भावनांची डायरी
किती गाऊ तुझे गुणगान...
लावू चल इश्काच रोप
संगमवर लागले आरोप
हो वेडी तू गं माझ्यात
तुझा करतो मी सन्मान...