सोबत
सोबत
चल ये आपण रे प्रेम करू
एकमेकांचा जन्माचा हात धरू
आशा केली मी तुला भेटण्याची....
वेळ आली रे तुला पाहण्याची
सत्यात तुझ्या सोबत जगण्याची....
नजर ना लागो माझ्या प्रेमाला
मनांत जपले तुझ्याच नामाला
दे मज मुभा नजर मिळवण्याची....
माझ्यावर कधी शक करू नको
आठवणींत माझ्या तू झूरू नको
निराशा होईल तुला गमावण्याची....
गुमान कर संगम मी रे तुझी आहे
हसती खेळती जवानी तुझी आहे
कृपा कर मला नशीबात लिहण्याची...