मेळ
मेळ
समजली ना तुझ्या प्रेमाची भेळ
त्याच्या बोलण्यात तुला ना वेळ....
झालात तुम्ही ग आज परत एक
बनलीस तू त्याच्या चारोळीची लेक
वेडा होतो कळला ना तुझा मज खेळ....
करतेस का माझे तू स्टेटस रोज सीन
करून ब्लॉक तुझा दिसेना लास्ट सीन
जमला आता त्याचा तुझा चांगला मेळ....
तुझ्यासाठी विसरलो होतो मी घर दार
झालीस बईमान त्या सोबत ईमानदार
दिसेना तुझ्या कवितेच्या शब्दांची ढेळ....
तो आता राजा तू त्याच्या ग्रूपची राणी
संगमच काय तो लिहतो रोज कहाणी
प्रेमाच्या दिव्यांचे तू आज हरवले तेळ.....
