आठवते का गं आई?
आठवते का गं आई?
ठेच लागताच मला,
कशी धावत तु येई,
कुरवाळून मिठीत घ्यायचीस,
आठवते का गं आई?
आता रक्तबंबाळ असतांना,
जवळ कुणी येत नाही,
वेदना असह्य होताना,
मला तुच आठवते आई
भुक लागताच मला,
आटापिटा तुझा होई,
पान्हा फुटे तेव्हा तुला,
आठवते का गं आई?
आता भुख लागली तरी,
उपाशी झोपतो माई,
चिमणी पिल्लांना चारा भरतांना,
मला तुच आठवते आई
rgba(255, 255, 255, 0);">पाणी आले माझ्या नेत्री,
गंगा यमुना तुझ्या वाही,
अश्रु माझे पुसायचीस,
आठवते का गं आई?
आता डोळे सदैव ओलेचिंब,
पुसायला मायेचा हात नाही,
अनावर अश्रु वाहतांना,
मला तुच आठवते आई
शाळेत जायची मला,
किती असायची घाई,
डब्बा घेऊन मागे यायचीस,
आठवते का गं आई?
पुस्तकांची शाळा छान,
जीवणाची शाळा जीव घेई,
अवघड कोडं सोडवताना,
मला तुच आठवते आई