राजकारण
राजकारण
नसता काही कारण,
होई विवाद विनाकारण,
येई जनतेचे त्यात मरण,
नाव याचे राजकारण
पाच वर्षाने वारी याची,
पुन्हा पुन्हा येत असते,
हात जोडूनी स्वारी आपल्या,
दारा पुढे उभी असते
द्या मत आम्हाला,
त्यातच तुमचं शाहणपण,
येता सत्ता आमची,
तुमच्यासाठी कायपण
तुम्हीच आमचे मायबाप,
अवलंबून तुमच्या मतावर,
गोड बालूनी तुरी दिल्या जाई,
पैसे घेणाऱ्या हातावर
गोड बोलूनी खोड मोडणे
ब्रिदवाक्य हे असते भारी,
निरोगी आच्छादनाखाली,
दडलेली असते महामारी
सत्ता येता हाती,
जीभल्या हे लागती चाटू,
संकटग्रस्त बळीराजाचे देखील,
प्राण हे पाहती घोटू
आवाज ते दाबले जातात,
पिडिताच्या घशात,
चोर पोलिस खेळ चाले,
सदैव हा खिशात
व्हा शहाने मित्रांनो,
असुद्या ताठ आपुली मान,
थोड्याश्या त्या पैशा खातीर,
विकू नका ईमान
