STORYMIRROR

Bhagyashri Chavan Patil

Drama Romance

4  

Bhagyashri Chavan Patil

Drama Romance

आयुष्य आणि माणसे

आयुष्य आणि माणसे

1 min
242

आयुष्यात प्रत्येकाने आपल्या परीने येवून डोकावले..

काही आपल्या गरजेनुसार वागत गेली आणि मला एकट सोडले..


काही जण वाऱ्याची झुळूक आल्यासारखी येवून गेले..

मी त्यांचा आयुष्याचा भाग होते हेच ते सगळे लोक विसरून ही गेले..


साथ अशी कोणाची मिळालीच नाही.. का माहित नाही एकटी फक्त मी उरले..

मग मला मीच नव्याने भेटत गेले आणि अपेक्षांचे ओझे माझ्या डोक्यावरून उतरले..


कोणी आपलं मिळेल ही आशाच मी सोडून दिली फक्त एकटी फक्त मी जगत राहिले..

कारण कोणी आपलं मिळायला भाग्य असावं लागतं आणि तशी वेळ ही यावी लागते हे पटले..


आता माणसे येतात आणि परत वेळ आली की निघून ही जातात हे पटायला लागलं ही होतं..

आपलं कोणी नाही मग मीच सगळ्यांची अशी भावना मनामध्ये ठेवली आणि ते रूचल ही होतं..


पण अचानक तुझ्या येण्याची सवय झाली होती का कोणास ठाऊक

वास्तवाचं भान असून देखील मला ते बघायचं न्हवत..


कारण तुझ्यासोबत असताना चेहऱ्यावरचं आलेलं हसू संपतच न्हवत

फक्त तुला माझ्याकडे हृदयाच्या कोपऱ्यात तुला ठेवायचं होतं..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Drama