घरची लक्ष्मी
घरची लक्ष्मी


तुझ्या समवेत घरात आनंद आहे
तुझ्यामुळे घरात लक्ष्मी नादांते आहे..
मुलगी परक्याचे धन नाही तर धन आहे
तिच्या मुळे घरात हास्य खळखळून हसते आहे..
तीच असणं म्हणजे आशेचा किरण आहे
प्रत्येक आई वडिलांना तीचा फार अभिमान आहे..
ताई म्हणून खंबीर पणे साथ नेहमी देत आहे
सक्की बहीण म्हणून जीवापाड प्रेम साऱ्यांना देत आहे..
चूल मुल ह्यात्तून ती जगाशी दोन हात करते आहे
कधी ममतेची गाय तर कधी आधी मायेचं रूप ती आहे..
माहेर आणि सासर या दोन्हींची कसरत ती रोज करते आहे
रोज नवीन आव्हाने हसत मुखाने पार करते आहे..
तीच असणं पूर्ण घराला मायेचं घरपण नेहमी देत आहे
ती आहे म्हणूनच तर तीनी लोक तिच्या मायेचा भुकेला आहे..
कधी आई मावशी काकी मामी आत्या अश्या भूमिका निभावत आहे
पण अजुन ही आई वडिलांची तानी लेक ती आहे..