STORYMIRROR

Bhagyashri Chavan Patil

Action Inspirational Others

3  

Bhagyashri Chavan Patil

Action Inspirational Others

कसा वाटतो आहे पेहराव

कसा वाटतो आहे पेहराव

1 min
156

पेहराव कोण करतो

लहानग्या पासून मोठ्या पर्यंत 

सगळेच करतो..


पेहराव कोण करतो

या पेक्षा त्या पेहरावाला कोण

बरं नतमस्तक होतो..


पेहराव कोण करतो

नट नाटककार भूमिका तो

पार पाडतो..


पेहराव कोण करतो

या पेक्षा त्या व्यक्ती मध्ये सखा

सोयरा पांडुरंग वाटतो..


पेहराव कोण करतो

या पेक्षा त्यांच्या तून आम्हाला

देव दिसतो..


पेहराव कोण करतो

या पेक्षा त्यांची शिकवण कोण

बरं लक्षात ठेवतो..


पेहराव कोण करतो

या पेक्षा माझा देव तुम्हा सर्वांना

काही सांगू पाहतो..


पेहराव कोण करतो

या पेक्षा त्यांच्या चालण्या बोलण्यात

देव हसताना दिसतो..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action