STORYMIRROR

Bhagyashri Chavan Patil

Romance

3  

Bhagyashri Chavan Patil

Romance

नात त्याचं माझं

नात त्याचं माझं

1 min
192

नातं ना मैत्रीचं नातं 

ना कोणत्या बंधनाच नातं

असतं ते जिव्हाळ्याच आपुलकीचं असतं..


इथे ना अपेक्षा ना काही मागणं

न मागताच खूप काही देवून जाणार असतं..


इथे राग नाही इर्षा नाही

इथे न मिळताच आहे तस

स्वीकारणं असतं..


इथे जपण नसतं तरीही

विश्वासाने नातं फुलत राहत..


ना रोजच बोलणं ना कधी भेट

पण हृदयाशी नातं अगदी थेट 

हेच नाव नसलेलं नातं साथ पुरेशी देत..


मागच्या जन्मीच पुण्य असावं लागतं

तेव्हाच कुठे हे नातं आयुष्यभर टिकून राहत..



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance