सखा लाभला
सखा लाभला
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
मागच्या जन्मीचे पुण्य असेल
म्हणून आपली भेट झाली आहे..
भूतकाळ भविष्यकाळ यात रमणारी मी
वर्तमानकाळ तुमच्या साठी राखला आहे..
अल्लड असणारी मी तुमच्या सोबत राहुन
अजुन थोड जगण्यातली समज वाढवत..
स्वप्न खरी होतात ऐकलं पाहिलं होतं
प्रत्येक्षात जगताना स्वतः मला नशीबवान वाटत..
मैत्री असावी पण आयुष्यभरासाठी आपला
असा सखा लाभला आहे..
माझ्या नकळत माझ्या कवितेला आणि
निखळ हसण्याला अर्थ मिळाला आहे..
आपलं नेहमी खुश असणं पाहूनच
दोघांच्या आई बाबांच्या चेहऱ्यावरही समाधान दिसत..
असं होईल तस होईल वाटत असताना
सगळं काही आपोआप जुळवून आल्या सारखं वाटतं..