Hurry up! before its gone. Grab the BESTSELLERS now.
Hurry up! before its gone. Grab the BESTSELLERS now.

Pallavi Umre

Drama


4.3  

Pallavi Umre

Drama


अस्तित्व

अस्तित्व

1 min 239 1 min 239

गजबजलेल्या वस्त्यांचे आज झाले स्मशान आहे

सरड्यागत रंग बदलणार् या लोकशाहीत

आज जीणे हराम आहे /


स्वार्थाच्या या दुनियेमधी कुणी माझा ना कुणी तूझा

स्वजन म्हणवितो ज्यांना, तेच विश्वासघातकी आहे /


जीवनामध्ये आकांक्षाचे, बांधले किती मनोरे

त्या मनोर् याचा ढासळलेला कळस शोधतो आहे /


कोण मी, कूठला मी माझे अस्तित्व ते काय?

शोधताना वाटा मी स्वतःच हरवले आहे !


दारिद्र्याच्या आभाळाला ठिगळ जोडताना

रात्रीच्या या अंधारामधी उजेड शोधतो आहे /


बुरखे मुखवट्याांचे फाडू तरी किती मी

गर्दीत रावणांच्या मी राम शोधतो आहे /


बेकारीच्या झिजवित टाचा, जीवन शोधतो आहे

लाचारी च्या या जगात माझे, अस्तित्व शोधतो आहे /


Rate this content
Log in

More marathi poem from Pallavi Umre

Similar marathi poem from Drama