वेदना
वेदना


धुमसणाऱ्या या वेदनांना, मोकळे रान झाले
आर्त मूक भावनांचे, ओठावर आज आले
कुरवाळीले का? उगाच,त्या संवेदनांना
उरी दाटले ते, सारे घाव नासूर झाले
ओढ अंतरी दाटली, दाटला तो गहिवर
नयनांच्या पापणीतून, ओघळले अश्रु सारे
तू दिलेल्या जखमांचे, घाव अजूनही ताजे
कुरवाळणे त्या जखमेस फार झाले
साठलेल्या वेदनांचा, डोह अंतरात अन्
जखमेच्या खपल्यांचे, भळभळणे फार झाले.