सांजेचा जादूगार...!
सांजेचा जादूगार...!


सांजेचा जादूगार हा
उधळीतो विविध रंग
जाताना सुखविण्या घालतो
मनावर फुंकर होउनी दंग
हवा हवासा वाटतो संग
पाहण्या विलोभनीय ते रंग
कोठेतरी असावा भासतो
त्या रंगातून हसरा श्रीरंग
शांत शीतल वात वाहता
भास होतो स्पर्शाचा
क्षण तो लाभे मज
नितदिन मोहक हर्षाचा....!