सूर्य आला धरतीवर...!
सूर्य आला धरतीवर...!


मुलगी शिकली प्रगती झाली
काना कानात आरोळी घुमली
घरोघरी मुलींची मग
पहाता पहाता सरशी दिसू लागली
इतिहासाची नव्या रचना
आपोआप घडू लागली
ध्येयवेड्यांची झेप
उंचच उंच भरारी मारू लागली
नवं नवे विक्रम ती
आता पादाक्रांत करू लागली
घोषणा हवेतली ती
सत्यात सार्थ ठरवू लागली
सर्वच क्षेत्रांची मानवाने
प्रगती वेगाने साधली
चार चार चंद्राची उत्पत्ती
सुद्धा म्हणे आता मार्गी लागली
निसर्गावर मात करण्याची
लालसा शिगेला पोहचली
सुर्यालाही जमिनीवर
आणण्याची मा
नवाने मजल मारली
इटली सारख्या देश्यामध्ये
विजय लैला गावात प्रगती पोहचली
आर्किटेक्ट इंजिनिअर लोकांनी
सुर्यालाही आणण्याची किमया केली
दरीमधल्या अंधाऱ्या गावी
आरश्यामधुनी प्रकाशाला खेचले
सूर्य उगवणे मावळणे सहजी
प्रगतीने लिलाया लोकांनी साधले
कौतुक करावे तितुके थोडे
सुटले अंधाराचे असे कोडे
काळ सुद्धा झुकला चिकाटी पुढे
पाहून प्रगतीचे रेशमी जोडे
दैव कृपा ही सारी
बुद्धी प्रगल्भ दिली मानवाला
का नाही भजावे सांगा
सुप्रभात काळी त्या देवाला...!