बा विठ्ठला
बा विठ्ठला
माऊलीला साकडे घालण्या
भक्तांचा महापूर आला
मुखी नाम माऊलीचे
उधाण या भक्तीला
करी सकलांची
मनोकामना
पंढरीचा
विठ्ठल
राजा
हा
अवघ्या पंढरीत भक्ती ही
असे आषाढी एकादशी
तिन्हीसांज जरी भक्ती
'बाप' माझा उपाशी
मागणे एकची
ठेव आनंदी
बा विठ्ठला
बापाशी
दूर
मी