Participate in the 3rd Season of STORYMIRROR SCHOOLS WRITING COMPETITION - the BIGGEST Writing Competition in India for School Students & Teachers and win a 2N/3D holiday trip from Club Mahindra
Participate in the 3rd Season of STORYMIRROR SCHOOLS WRITING COMPETITION - the BIGGEST Writing Competition in India for School Students & Teachers and win a 2N/3D holiday trip from Club Mahindra

Sneha Kshirsagar Jathar

Drama Tragedy


0.2  

Sneha Kshirsagar Jathar

Drama Tragedy


संध्याकाळ

संध्याकाळ

1 min 13.6K 1 min 13.6K

अजूनही आठवते मला, लहानपणीची ती संध्याकाळ

आईने ऑफिसमधून येताना आणलेला खाऊ, वाटून खायचो आम्ही चवदार ।।१।।


अजूनही आठवते मला, लहानपणीची ती संध्याकाळ,

पाळणा घरातून परतण्याची ती वेळ,

बिल्डिंग मधल्या मित्रांसोबत,

रमायचा मग आमचा खेळ ।।२।।


अजूनही आठवते मला, कॉलेजमधली ती संध्याकाळ,

रॉक्सीचं सँडविच आणि प्रभुजची फ्रुट बिअर,

राम मारुती रोडवरच्या त्या गप्पा,

लाईफ होती तेव्हा कशी विदाउट फिअर ।।३।।


अजूनही आठवते मला, कॉलेजमधली ती संध्याकाळ,

कॉलेज संपल्यावरही असाइन्मेंट्सच्या गप्पा,

लेक्चर बंक करून मित्रांसोबत,

निर्मल्सचा तो कट्टा ।।४।।


कॉलेज संपल्यावर मात्र, ती संध्याकाळ दिसेनाशी झाली,

ऑफिसच्या पॉश क्यूबमध्ये, ती कुठेतरी हरवून गेली ।।५।।


बाहेर इंद्रधनुष्यासोबत रिमझिम पडणाऱ्या पावसाच्या धारा असतात,

आत मात्र इमेल्स आणि फोन कॉल्सचा सतत मारा असतात ।।६।।


बाहेर मावळत्या सूर्य प्रकाशाने तांबडा झालेला आकाश असतो,

आत मात्र मंद पेटणाऱ्या दिव्यांचा प्रकाश असतो ।।७।।


आज परत मला ती पहिल्यासारखी संध्याकाळ हवीशी वाटते,

खेळ आणि खाऊ नाही तर, बागेत एक एकांत फेरी मारावीशी वाटते ।।८।।


आज परत मला ती पहिल्यासारखी संध्याकाळ हवीशी वाटते

फोन आणि गप्पा नाही तर, आराम खुर्चीत बसून गरम कॉफी घ्यावीशी वाटते ।।९।।


ऑफिसमध्ये कामात असताना, घड्याळाकडे लक्ष गेलच नाही,

हातात गरम कॉफीचा मग होता, पण संध्याकाळ कशी सरली कळलंच नाही ।।१०।।


Rate this content
Log in

More marathi poem from Sneha Kshirsagar Jathar

Similar marathi poem from Drama