We welcome you to write a short hostel story and win prizes of up to Rs 41,000. Click here!
We welcome you to write a short hostel story and win prizes of up to Rs 41,000. Click here!

Prashant Shinde

Drama Others


3  

Prashant Shinde

Drama Others


कलियुग...!

कलियुग...!

1 min 14.1K 1 min 14.1K

कलियुगात प्राप्ती पासून

मोक्षापर्यंत सार झटपट मिळतं

आंधळं दळतं आणि कुत्रं पीठ खातं

तसं मागेल ते नशीब सार देतं


जप तप व्रत वैकल्य

उपास तापास काही लागत नाही

एवढी क्रांती झाली की क्लिकवर

इच्छा पूर्ण झाल्या वाचून रहात नाही


कोणीही उठतो पिंडीत घुसतो

जे पिंडी ते ब्रम्हांडी म्हणतो

मीच ब्रम्हा मीच विष्णू मीच महेश

म्हणून डोक्यावर बसतो


बोट दाखवून चौपट शहाणा

स्वतःला म्हणा म्हणतो

अति तिथे माती माहीत असून

माझीच लाल म्हणत बसतो


असे कित्येक आले कित्येक गेले

नावाची त्यांच्या गणना नाही

तरीही कडी लावा आतली

मी नाही त्यातली कोकलून सांगतो


कलियुग आहे बाबा

इथे दिव्या खाली अंधार नसतो

म्हणून साहेब दादा बाबा आप्पा

यांच्या प्रकाशात सारा जन्म सरतो


सत्य सत्यच असत

हे तो विधाताही जाणून असतो

आपलं अज्ञान दूर करण्या

तोच खरा समर्थ असतो


त्याच्या तेजात एकदा

ज्ञान सम्पन्न होऊन न्हाऊन घ्यावं

चांगल चांगल ते सारं वेचून

राजहंसा सारखं उज्वल उन्नत जीवन जगावं....!!Rate this content
Log in

More marathi poem from Prashant Shinde

Similar marathi poem from Drama