STORYMIRROR

Rucha Rucha

Drama Romance Tragedy

4  

Rucha Rucha

Drama Romance Tragedy

सखये थोडंसं जगून घेशील???

सखये थोडंसं जगून घेशील???

1 min
234

थोड्याश्याच मिळालेल्या आयुष्यात

सर्व काही गोड मानतेस तू..

इतरांचं सारं काही करताना 

स्वतःला विसरतेस तू...

सखये थोडस स्वतःसाठी जगून घेशील?


नवऱ्याची अपार सेवा अन्

सासर मंडळींचं आदरतिथ्य करतेस तू

मुलांचं सगळं करता करता

स्वतःला झोकून देतेस तू..

सखये थोडंसं स्वतःसाठी जगून घेशील?


स्वयंपाकघर झालंय तुझं विश्व

तुझ्यातील अवखळ मुलगी हरवलीस तू

विविध नात्यांच्या बंधनात सखे

स्वतःचीच ओळख विसरलीस तू...

सखये थोडंसं स्वतःसाठी जगून घेशील


आवडतो तुला पिझ्झा तरीही

स्वतःची इच्छा मारतेस तू..

सर्वांच्या आवडीनिवडीचं बनवताना

स्वतःच्या आवडीचं विसरलीस तू..

सखये थोडंसं स्वतःसाठी जगून घेशील?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama