Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sagar Nanaware

Drama

5.0  

Sagar Nanaware

Drama

हरवलेलं बालपण ......

हरवलेलं बालपण ......

1 min
14.2K


मोठा माणूस बनण्याची

फार झाली घाई

हरवलेलं बालपण मला

सापडेल का गं आई ?


अभ्यासाच्या गणितात

लागत नव्हता लळा

पिटीचा तास येताच

आवडू लागायची शाळा

चुकल्यावरती छडी द्यायला

पुन्हा येतील का त्या बाई

हरवलेलं बालपण मला

सापडेल का गं आई ?


चार आण्याच्या नाण्यानं

मन जायचं भरून

लिमलेटच्या गोळ्या आणि

बिस्कीट यायचं वरून

त्या चाराण्याची सर

आज नोटांनाही नाही

हरवलेलं बालपण मला

सापडेल का गं आई ?


चड्डीवरच्या मित्रांची

व्हायची पारावरती भेट

आपुलकीच्या गप्पांसाठी

कधी लागलंच नाही हो नेट

सुरपारंबीच्या डावासाठी

आता झाडंच उरलं नाही

हरवलेलं बालपण मला

सापडेल का गं आई ?


मनसोक्त जगण्याचे ते

वेगळेच होते दिवस

छोट्या गोड स्वप्नांसाठी

कधी केलाच नाही नवस

खूप सारं कमावलं

तरी राहतंय बरंच काही

हरवलेलं बालपण मला

सापडेल का गं आई ?



Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama