STORYMIRROR

Sagar Nanaware

Tragedy Crime

4  

Sagar Nanaware

Tragedy Crime

सेलिब्रिटी असावं लागतं

सेलिब्रिटी असावं लागतं

1 min
396

सुशांत झाला शांत याचं मलाही वाईट वाटतं 

एक मात्र खरं भाऊ न्याय मिळविण्यासाठी इथं सेलिब्रिटी असावं लागतं


टीव्ही पेपरवर राजकारणाचा जोमात चाललाय

धंदा हरवून गेला बातम्यांत यांच्या मायबाप जगाचा पोशिंदा 

कर्जबाजारी अन नापिकीने त्याला रोजरोज मरावं लागतं 

भाऊ न्याय मिळविण्यासाठी इथं सेलिब्रिटी असावं लागतं


अरे कोपर्डीची ताई ती काय म्हणत असेल 

बलात्काराच्या बातम्या पाहून आजही कण्हत असेल 

आजही सुरक्षित नाही स्त्री याचं दुःख मनात दाटतं 

भाऊ न्याय मिळविण्यासाठी इथं सेलिब्रिटी असावं लागतं


दाभोलकर,पानसरे,कलबुर्गी यांचा काय होता गुन्हा 

समाजासाठी लढले ते दररोज नव्याने पुन्हा 

अपराध्यांना शिक्षा नाही याने आजही मन झुरतं 

भाऊ न्याय मिळविण्यासाठी इथं सेलिब्रिटी असावं लागतं


अरे सीमेवरती रात्रं दिस माझा सैनिक आहे उभा 

सुरक्षित आहोत आपण मिळते आनंदाची मुभा 

शहीद होतो तो रक्षणकर्ता तेव्हा वरवरचं प्रेम दाटतं 

भाऊ न्याय मिळविण्यासाठी इथं सेलिब्रिटी असावं लागतं.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy